आठवणीने आठवाव असे हल्ली मी काही आठवतच नाही
आठवणीच्या गावात मनाला पाठवतच नाही
आठवून आठवून आठवणी आठवायच्या तरी कशाला
आठवून मोहरून यावे असे ओंजळीत काही सध्या काही नाही
या साठी आठवणीच्या मैफीलीत मी हळवे सूर आळवत नाही
तरीही मनभर आठवणी साचत जातात,,
तेव्हा वाटते आठवणी व्हाव्या शीतल चांदण्यासारख्या
सुखाचा गारवा देणार्या
काळजातल्या गोंडनासारख्या
ना की तप्त आगीत मनही जाळणार्या
तापत्या प्रखर सुर्यासारख्या
त्यासाठी मग नव्या उर्मीने आयुष्याचे पण उलटत जाते
आणि विसरायचे म्हणून पुन्हा तेच आठवत जाते......
(किती आणि काय काय विसरायचे आहे हे शोधते मी कदाचित
आणि मग परत त्यातच गुंतत जाते))
Subscribe to:
Post Comments (Atom)

Vvha kay sundar kavita ahe!
ReplyDeleteKharach athavani yetat apan kitihi thambavle tari. Tya swatahachya marjinusar vagtat. Apan fakt vaat pahat rahave. Tya kadhi yene thambavtil ani aplyalala nave ayushya sukhane jagu detil...