Thursday, March 4, 2010

वेळ

संध्याकाळ छळते खूप... याचा प्रत्यय मी आनेकदा घेतलाय
का असे एकटे असावे तेही संध्याकाळी??
असे काही सुचवत असते का??
खरच बरेच जण म्हणतात तसे काही नाते आपले गहिरे असते का संध्याकळाशी??
काही हूरहुर मनात दाटते माहीत नाही का??
जेव्हा मी गॅलरीत उभी राहते अशी संध्याकाळी
....
खूप लिहायचे लिहायचे पण वेळ मिळत नाही
मग लिहायला बसले की
पंख फुटल्यासारखे शब्द बाहेर येतात लाखोनि की मी विसरते
हरवते बहुतेक..

जगात प्रेम आनंद याच्या काय कुठल्याच गोष्टीच्या व्याख्या करणे शक्य नाही..
पण त्याची आनुभूती तर येते सगळ्यानाच....

कोणावर तरी खूप भरभरून जीव ओतावा आणि मग पुढे ?????
कोणी आपल्याला ही जीव लावला की त्याची पूर्णता होते
एक वर्तुळ बनते...
नाही तर आयुष्य चालत राहते सरळ एका रेषेत..
कधी जाणवते आपण आयुष्य जागलोच नाही
शेवटी...काय उरते तेव्हा जगावे वाटले तरी हातात??
काहीच नाही ना
कारण नाहीच जगू शकत आताचे आयुष्य आपण नंतर...
आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण एकदाच येतो...
आणि मग जातो कधी ना परतण्या साठी...
तरी का नाही आपण जगत् तो क्षण???

मूल लहान असते तेव्हा किती गोड वाटते त्याची प्रत्येक गोष्ट
मग ते तसेच नाही राहत ती गोष्ट बदलते...
तो बोलायला लागतो चालायला लागतो आणि थॅंकस तो कॅमरा फक्त ती आठवण कैद होते...
पण ते परतत नाही...
मग आयुष्य जगायला हव पूर्णपणे ....
नुसताच नाही तर...विचार पूर्वक..
पण प्रत्येक क्षण जगता यायला हवा
आज नाही तर उद्या जमेल पण
जगण जमेल तेव्हा.... जेव्हा जगावे वाटेल

आपण आयुष्यात फक्त आपल्या जवळच्यानाच दुखी करतो..
कारण ते आपले असतात आपला हक्क असतो त्यांच्या वर...
पण एका मर्यादे बाहेर ते चुक नाही का??
त्याना आपले आहेत तर जगायचा हक्क नाही का??
त्यांच्या छोट्या गोष्टीत आपण त्याना खुश ठेवू शकत नाही का??
त्याना खुश करणे हा देखील आपल्या प्रेमाचा भाग असतो आपल्या लोकांवर
मग प्रेम दाखवणे गरजेचे नाही????
जेव्हा आपल्या लोकांवर आपण त्रागा करू शकतो,,प्रेम का नाही??

त्याना ही प्रेम हवे असते ..
हे समजणे खूप गरजे चे आहे आज...

कारण उद्या वेळ गेलेली असेल.

1 comment:

  1. Khoopach sauvedanashil ahe tuzi kavita.
    Avadali.. khoopach..

    ReplyDelete